नऱ्हे, कोथरुडमध्ये मोबाईल शॉपी फोडल्या; 1 लाख 71 हजारांचे मोबाईल, टीव्ही चोरले

पुणे शहरातील नऱ्हे आणि कोथरुड परिसरातील मोबाईल शॉपीचे शटर उचकटून चोरट्यांनी 1 लाख 71 हजारांचे मोबाईल, टीव्ही चोरुन नेले. या घटना बुधवारी दिवसांपुर्वी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडल्या आहेत.

नऱ्हेतील चोरीप्रकरणी अरविंद दीनकर बोबडे (वय 37, रा. नऱ्हे ) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हेतील मानाजीनगरमध्ये अरविंद यांचे जय गणेश शॉपी नावाचे दुकान आहे. त्यामध्ये मोबाईल, टीव्हीची विक्री केली जाते. दोन दिवसांपुर्वी चोरट्यांनी त्यांच्या बंद मोबाईल शॉपीचे शटर उचकटून 1 लाख 11 हजारांचे मोबाईल आणि टीव्ही चोरुन नेले. दुसऱ्या दिवशी अरविंद शॉपी उघडण्यासाठी आले असता, त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस तपास करीत आहेत. दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी कोथरुड परिसरातील मोरया मोबाईल शॉपीचे शटर उचकटून 60 हजारांचे 10 मोबाईल चोरुन नेले. याप्रकरणी गौतम रामयश यादव (वय 25, रा. शिवणे) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या