
सराईत गुंड सुरज ठोंबरे याच्या टोळीतील आणि मोक्का गुन्हयात फरार असलेल्या आरोपीला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. तो बायकोला भेटायला आला असतानाच समर्थ पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले. गोट्या माने उर्फ नरसिंह भिमा असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात दरोडा, फरासखाना पोलीस ठाण्यात दरोड्याची तयारी असे गुन्हे दाखल असून समर्थ पोलीस ठाण्यात मोक्काच्या गुन्ह्यात तो फरार होता.
पोलिसांनी सुरज ठोंबरे टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई केली आहे. मोक्कापासून गोट्या फरार झाला होता. गोट्या त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी मंगळवार पेठेतील शाळेजवळ येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते, पोलीस नाईक निलेश साबळे, सुमित खुटटे व महेश जाधव यांना मिळाली. त्यानूसार पथकाने सापळा रचून गोट्याला ताब्यात घेतले. त्याला मोक्का न्यायालयात हजर केले असता 22 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुशिल लोणकर, संतोष काळे, सुभाष पिंगळे, विठ्ठल चोरमले, सुभाष मोरे, हेमंत पेरणे, सचिन पवार, श्याम सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.


























































