तेरा कुख्यात गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई

444

संघटीत गुन्हे करणारा कुख्यात गुन्हेगार चांगदेव भारम भोसले (रा. पढेगाव ता. कोपरगाव) याच्यासह त्याच्या टोळीतील 13 आरोपींविरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांनी कारवाईच्या प्रस्तावास मंजुरी दिली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी दिली.

हिरु वडोद भोसले (36, रा. पढेगाव ता. कोपरगाव), भगिरथ वडोद भोसले (28, रा. पढेगाव ता. कोपरगाव), ज्ञानेश्वर पांडरंग जाधव (24, रा. वडगाव ता. कोपरगाव), करण बाळू मोहिते (25, रा. धुळगाव ता. येवला, जि. नाशिक), नामदेव फुलचंद भोसले (रा. वडगाव ता. कोपरगाव), भागवत भारम भोसले (रा. पढेगाव ता. कोपरगाव), दगू वडोद भोसले (रा. पढेगाव ता. कोपरगाव), दीपक भारम भोसले (रा. पढेगाव ता. कोपरगाव), भिवसेन भारम भोसले (रा. पढेगाव ता. कोपरगाव), पांडुरंग फुलचंद भारम भोसले (रा. पढेगाव ता. कोपरगाव), विजय चव्हाण (रा. कोपरगाव), पांडुरंग फुलचंद जाधव (रा. वडगाव ता. कोपरगाव) या गुन्हेगारांच्या विरोधात ही कारवाई होणार आहे. या गुन्हेगारांनी संघटीतपणे गुन्हे केले आहेत. त्यांच्या टोळीविरोधात कोपरगाव पोलिस ठाण्याने मोक्का कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक कार्यालयास सादर केला होता. पोलिस अधीक्षक सिंधु यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून तो विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला होता. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधीक्षकांकडे देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आणखी 7 ते 8 टोळ्यांविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई प्रस्तावित आहे. मंजुरी मिळताच या टोळ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सिंधू यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या