मॉकड्रिलमध्ये जखमी जवानाचा पाय निकामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माटुंगा येथे मॉकड्रिल दरम्यान जखमी झालेले अग्निशमन दलाचे जवान सदाशिव कर्वे यांना त्यांचा पाय गमवावा लागला. आगीपासून बचाव करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, यासाठी मॉकड्रिल करत असताना शनिवारी अपघात झाला होता.

धारावी अग्निशमन केंद्राच्या वतीने माटुंगा येथे आगीपासून बचाव कसा करावा, यासाठी साई सिद्धी इमारतीत मॉकड्रिल आयोजित करण्यात आली होती. या मॉकड्रिल दरम्यान पाण्याचा दाब वाढून एक गाडी अचानक सुरू झाल्याने अपघात झाला. यात चालक सदाशिव कर्वे, चंचल पगारे आणि निवृत्ती इंगवले जखमी झाले. या तिघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.