जम्मू-कश्मीर, गुजरात, पंजाब, राजस्थानमध्ये आज मॉकड्रील

पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये गुरुवारी सायंकाळी मॉकड्रील होणार आहे. यात जम्मू आणि कश्मीर, गुजरात, पंजाब आणि राजस्थानचा समावेश आहे. या मॉकड्रीलला ऑपरेशन शील्ड असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ब्लॅकआऊट, सायरन आणि सतर्कता असे चित्र असणार आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. युद्ध झाल्यास नेमके काय करायचे याचे प्रशिक्षण देण्यासाठी मॉकड्रील असणार आहे असे संरक्षण दलाने स्पष्ट केले आहे.