220 पुरुषांसोबत डेटिंग; पण लग्न-हनीमून कुत्र्यासोबत करणार, मॉडेल निर्णयावर ठाम

128
elizabeth-hoad
Photo : thesun.co.uk

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मॉडेल म्हणून करिअर करणाऱ्या एका महिलेने 220 पुरुषांना डेट केल्यानंतर आता कुत्र्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. एलिजाबेथ होड असे या मॉडेलचे नाव आहे. सहा वर्षांचा गोल्डन रिट्रीवर कुत्रा ‘लोगन’सोबत लग्न करण्यास ती तयार झाली आहे.

एलिजाबेथने कुत्र्यासोबतच्या लग्नासाठी विशेष प्लानिंग केले आहे. thesun.co.uk च्या माहितीनुसार, मॉडेल वेडिंग रिंग घालणार आहे, तर लोगन रिस्टबँड घालणार आहे. या लग्नासाठी केवळ 20 जणांनाच आमंत्रण देण्यात येणार आहे. तसेच लग्नानंतर खास हनीमूनचा प्लान असून एलिजाबेथ डॉग फ्रेंडली हॉटेलमध्ये हनीमूनसाठी जाणार आहे.

ब्रिटनच्या बर्क्स येथे राहणारी एलिजाबेथचा याआधी दोन वेळा साखरपुडा (एन्गेजमेंट) झाला आहे. मात्र तिचं लग्न होऊ शकलं नव्हतं. एलिजाबेथच्या म्हणण्यानुसार तिने 8 वर्षांत 6 डेटिंग साईटवरून तब्बल 220 पुरुषांसोबत डेटिंग केलं आहे. पण कुणासोबतही चांगला अनुभव आला नाही. त्यामुळे मी विचार केला की लोगन सोबतच लग्न केलंलं चांगलं कारण तो कधी मला सोडून जात नाही आणि आम्ही एकमेकांना खूप प्रेम देतो.

आपली प्रतिक्रिया द्या