प्रसिद्ध मॉडेलची गोळ्या घालून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बगदाद

एका प्रसिद्ध मॉडेलची भररस्त्यात तिच्या कारमध्येच गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. तारा फारिस असे त्या मॉडेलचे नाव असून ती इराकची प्रसिद्ध इंस्टाग्राम मॉडेल आहे. ताराने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंवरून ती प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर तिला अनेक मॉडेलिंग ऑफर यायला लागल्या होत्या. मात्र मुस्लीम कट्टरपंथीयांकडून तिच्यावर सतत टीका व्हायची यातूनच तिची हत्या करण्यात आली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

20 वर्षांची तारा ही तिच्या टॅटू, स्टायलिश हेअर कलर्स, डिझायनर कपडे आणि तिच्या सौंदर्यांसाठी इराकमध्ये खूप प्रसिद्ध होती. तिचे इंस्टाग्रामवर लाखो चाहते होते. तारा शुक्रवारी तिच्या मैत्रिणीला भेटायला जात असताना तिची गाडी सिग्नलला थांबली होती. त्यावेळी बाईकवरून आलेल्या दोघांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात तिचा जागीच मृत्यू झाला.