मॉडेलिंगसाठी आलेल्या तरुणीवर कुर्ल्यात बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rape
प्रातिनिधिक फोटो

मध्य प्रदेशातून मॉडेलिंगमध्ये नशीब आजवण्यासाठी मुंबईत आलेल्या एका 28 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना कुर्ल्यात घडली. या प्रकरणी विनोबा भावे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंकी (नाव बदललेले) ही 28 वर्षीय तरुणी मॉडेल बनण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मुंबईत आली होती. ती अंधेरीतील मरोळ येथे भाडेतत्त्वावर राहत होती.

4 फेब्रुवारी रोजी रात्री एका व्यक्तीने तिला ऑडिशनच्या बहाण्याने साकीनाका येथील एका हॉटेलवर बोलावले. त्या ठिकाणी आधीच दोन तरुणी होत्या. दरम्यान, त्याच वेळी पोलिसांचा तेथे छापा पडला आणि पोलिसांनी जबाब नोंदवून तिघींनाही सोडून दिले. त्यानंतर पोलिसांचा खबऱ्या असल्याचे सांगत एक तरुण पिंकीजवळ आला आणि माझ्यामुळे तू वाचलीस असे सांगून तिला जेवण करण्यासाठी एलबीएस रोडवरील कल्पना सिनेमागृह येथे घेऊन गेला. तेथे जेवण केल्यानंतर जवळच असलेल्या हॉटेलात आराम करण्यासाठी चल मग सकाळी उठून घरी जा असे सांगून तो भामटा पिंकीला हॉटेलात घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. सकाळी उठल्यानंतर पिंकीने थेट साकीनाका पोलीस ठाणे गाठून जोहेब नावाच्या पोलीस खबऱ्याविरोधात बलात्कार केल्याची तक्रार दिली. गुह्याचे ठिकाण व्ही.बी. नगरच्या हद्दीत असल्याने गुह्याचा तपास व्ही.बी. नगर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला.