
बबनराव…मोदी फक्त तुमचे बाप असू शकतात, जनतेचे नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजप नेते बबनराव लोणीकर यांच्यावर केली आहे. तुझ्या अंगावरचे कपडे अन् पायातील चप्पल सरकारमुळेच, शेतकऱ्यांबाबत असे वादग्रस्त बबनराव लोणीकर यांनी केले होते. यावरच संताप व्यक्त करत अतुल लोंढे म्हणाले आहेत.
X वर एक व्हिडीओ पोस्ट करत अतुल लोंढे म्हणाले की, “जनता ही मायबाप आहे आणि सरकार म्हणजे एखाद्या नेत्याचा मालकी हक्क नाही.” सामान्यांच्या करातून आलेली संपत्ती, भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठीशी असलेली मूग गिळलेली सरकारची भूमिका आणि महिलांवरील अन्यायाचं मौन समर्थन, या सगळ्यावर लोंढे यांनी सवाल केला. ते म्हणाले आहेत की, “जेव्हा गुन्हेगार मोकाट फिरतात आणि जनतेचा आवाज दडपला जातो, तेव्हा समजावं की, हे सरकार नाही, ही फक्त सत्ता गाजवण्याची अरेरावी आहे.”
“बबनराव…मोदी फक्त तुमचे बाप असू शकतात, जनतेचे नाही..!” – काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा सत्ताधाऱ्यांना खडसावणारा इशारा….!
“जनता ही मायबाप आहे, आणि सरकार म्हणजे एखाद्या नेत्याचा मालकी हक्क नाही”. सामान्यांच्या करातून आलेली संपत्ती, भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठीशी असलेली मूग… pic.twitter.com/4v2geDpT6z
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 26, 2025