लेक्चर देऊ नकोस, मोहम्मद कैफने इम्रान खानला सुनावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
मोहम्मद कैफ याने 2014 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र भाजपचे केशव प्रसाद मौर्य यांनी त्याचा पराभव केला हो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अल्पसंख्याकांना कशी वागणूक द्यायची हे आम्ही नरेंद्र मोदींना शिकवू, असे वक्तव्य करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर सध्या टीकेची झोड उठलेली असतानाच हिंदुस्थानचा क्रिकेटपटू मोहम्मद कैफने देखील इम्रान खान यांना फटकारले आहे. कैफने इम्रान खान यांना लेक्चर देऊ नकोस अशी ताकिद देत ट्विटरवरून त्यांच्यावर टीका केली आहे.

‘फाळणीच्या वेळी पाकिस्तानात 20 टक्के अल्पसंख्याक होते त्यातील आता 2%टक्क्याहून कमी अल्पसंख्याक तेथे उरले आहेत. तर हिंदुस्थानात अल्पसंख्याकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अल्पसंख्यांकांना कसे वागवायचे यावर लेक्चर देण्यासाठी पाकिस्तान हा जगातील शेवटचा देश ठरेल’ असे कैफ याने ट्विट केले आहे.