
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या कॅप्टनशीपमध्ये संघ चांगला खेळ करत असला तरी त्याच्यावर अनेकदा टीका होत असते. टीम इंडियात सतत केले जाणारे बदल, चौथ्या स्थानावरील फलंदाज अद्याप निश्चित न झाल्याने विराटला अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले आहे.
नुकतंच टीम इंडियाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफ याने देखील विराट कोहलीवर टीका करत त्याला चांगलेच फटकारले आहे. ‘कोहली संघ निवडीमध्ये सतत वेगवेगळे प्रयोग करत असतो. त्याने असे नाही केले पाहिजे. कोहलीने अनेक जोड्या खेळवून बघितल्य़ा. तसंच गेल्या वर्ल्ड कपला त्याने जास्त खेळल्या नसलेल्या खेळाडूंना संधी दिली. कोहलीने एक लक्ष्य ठेवून त्याचा संघ निवडला पाहिजे. जर एखाद्या खेळाडूचा काही सामन्यात फॉर्म बिघडला तरी कोहलीने त्याला पाठिंबा दिला पाहिजे. कोहलीने चांगले खेळाडू घडवले पाहिजे तरच तो एक चांगला संघ तयार करू शकेल’, अशी टीका मोहम्मद कैफने कोहलीवर केली आहे. हॅलो अॅपच्या एका लाईव्ह सेशनमध्ये बोलताना त्याने ही टीका केली आहे.