ऑस्ट्रेलिया मालिकेआधी टीम इंडियाला धक्का, मोहम्मद शमी कोरोना पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-20 मालिकेला तो मुकणार आहे. शमीची गैरहजेरी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरणार आहे.

20 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या हिंदुस्थान ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाने सराव सुरू केला आहे. पहिला सामना मोहाली स्टेडियमवर होणार आहे. तब्बल सहा वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ मोहालीत सामना खेळणार आहे.