
टीम इंडियाचा जबरदस्त गोलंदाज मोहम्मद शमी हा दुखापतग्रस्त असल्याने सध्या तो इंग्लडविरुद्धच्या मालिकेला मुकत आहे. शमीच्या गैरहजेरीत टीम इंडियाची गोलंदाजी काही प्रमाणात कमजोर पडली आहे. शमी लवकरच टीम इंडियात कमबॅक करणार आहे. टीम इंडियासाठी ही मोठी खूषखबर आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अॅडलेड टेस्टमध्ये मोहम्मद शमीच्या मनगटाला दुखापत झाली होती. फलंदाजी करत असताना पॅट कमिन्सच्या चेंडू त्याच्या मनगटाला लागला होता. त्यामुळे शमीला तो दौरा अर्धवट सोडून परतावे लागले होते. सध्या शमी दुखापतीतून सावरला असून तो बंगळुरू राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ट्रेनिंग घेत आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत मोहम्मद शमी कमबॅक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मोहम्मद शमीने एनसीएमध्ये सराव करत असतानाच व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात त्याच्यासोबत नवदीप सैनी देखील दिसत आहे. ज्या अर्थी त्याने सराव सुरू केलाय त्या अर्थी त्याच्या मनगटातील दुखापत बरी झाली आहे. पुढचे काही दिवस शमी धीम्या गतीने गोलंदाजी करत सराव करेल. दिवसभरात त्याला 18 चेंडू टाकण्याची परवानगी दिल्याचे समजते.





























































