
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या संघातील समावेशामुळे टीम इंडियाचा वेगवान ताफा आणखीन मजबूत झाला आहे. वेग आणि आक्रमकता असलेल्या सिराजने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतही छाप उमटवली आहे. लॉर्डस कसोटीमध्ये सिराजने आठ गडी बाद करत यजमान संघाचे कंबरडे मोडले होते.
विरोधी संघाच्या खेळाडूला बाद केल्यानंतर मोहम्मद सिराज ज्या प्रकारे सेलिब्रेशन करतो त्याचीही सोशल मीडियावर चर्चा आहे. तोंडावर बोट ठेवून तो विरोधी संघाच्या खेळाडूला गप्प करतो. त्याच्या याच स्पेशल सेलिब्रेशनवर हैद्राबादचे नागरिक फिदा झाले आहेत. होमटाउन असलेल्या हैद्राबादमध्ये सिराजचे मोठे कटआउट लागले आहेत. यात तो ओठांवर बोट ठेवून सेलिब्रेशन करताना दिसतोय. चाहत्यांनी त्याचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
No prizes for guessing who this is. A cutout of our ✨ Mohammed Siraj was spotted in Hyderabad. #PlayBold #MohammedSiraj #TeamIndia pic.twitter.com/SvubBlov3B
— RCB 12th Man Army (@rcbfansofficial) August 20, 2021
…म्हणून ओठांवर बोट ठेवतो
मोहम्मद सिराज विकेट घेतल्यानंतर ओठांवर बोट का ठेवतो हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. टीकाकारांना गप्प करण्यासाठी तो असे करतो असे दिसून येते. सिराजनेच याबाबत खुलासा केला होता. याबाबत विचारले असता तो म्हणाला की, माझ्याबाबत बोलणाऱ्या टिकाकारांसाठी मी असे करतो. माझ्या गोलंदाजीने मी त्यांना उत्तर देतो. सेलिब्रेशनचा हा माझा नवीन अंदाज असल्याचेही तो म्हणाला.
कोहलीच्या सांगण्यावरुन बुमराहने अँडरसनला जखमी करण्याचा प्रयत्न केला!
11 बळी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केलेल्या मोहम्मद सिराजने इंग्लंडविरुद्ध धारधार गोलंदाजी केली आहे. पहिल्या दोन कसोटीत त्याच्या नावावर 11 बळींची नोंद आहे. नॉटिंगहॅम कसोटीत त्याने 3 बळी घेतले होते, तर लॉर्डस कसोटीत त्याने दोन्ही डावात मिळून 8 बळी मिळवले.

























































