
विविध कारणांमुळे जिथे जिथे हिंदूंची लोकसंख्या कमी झाली, तिथे तिथे समस्या निर्माण झाल्या, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मंगळवारी व्यक्त केले. हिंदू राष्ट्राच्या परम वैभवामुळे जगाचे कल्याण होईल. याच अनुषंगाने संघ हा सर्वव्यापी होऊन जागतिक कल्याणाबद्दल चर्चा करणार आहे, असेही ते म्हणाले.
राजस्थानातील उदयपूरमध्ये आयोजित संघाच्या शिबिरात ते बोलत होते. यावेळी त्यांनी संघाचे संस्थापक डॉ. केशवराव हेडगेवार यांच्या शिकवणीला उजाळा दिला. स्वातंत्र्यानंतर आपण इतरांवर अवलंबून राहू नये, यासाठी काम करण्याची गरज त्यांनी ओळखली. याच चिंतनातून संघाचा जन्म झाला, असे मत मांडत भागवत यांनी हिंदूद्वेषींना फटकारले. आपण हिंदू नाहीत, अशा प्रकारची एक मोहिम देश व समाजाला कमकुवत बनवण्यासाठी राबवली जातेय, अशी टीका त्यांनी केली.




























































