सुदामा कृष्ण कॅप्शनवरून धर्मांधांकडून कैफ ट्रोल

1314

माजी क्रिकेटर मोहम्मद कैफ याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची भेट घेतली. त्याचा फोटो त्याने ट्विटरवर पोस्ट करत हा कृष्ण सुदामा मोमेंट असल्याचे म्हटले होते. त्यावरून अनेकांनी कैफ याची प्रशंसाही केली होती. परंतु अनेक धर्मांधांना ही कॅप्शन न पटल्याने त्यांनी कैफला ट्रोल केले आहे.

कृष्ण सुदामा असे म्हणून कैफने सचिन तेंडूलकरसोबत फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. त्यावर अनेक धर्मांधांनी ट्रोल केले आहे. काहींनी कैफला नाव बदलण्याचा सल्ला दिला आहे,

काम मिळवण्यसाठी कैफने आपला इनाम विकल्याचा आरोप काहींनी केला आहे.

तसेच असे काही बोलण्यापूर्वी विचार करायला हवा होता असे एका ट्विटर युजरने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या