विनयभंगाची तक्रार दाखल करू नका, मुख्याध्यापिकेची पीडित मुलीला धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्हावाशेवा- उरण शहरातील एका शाळेत आठवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला होता. या प्रकरणी कुठलीही तक्रार करायची नाही अशी धमकी शाळेच्या मुख्याधिपिकेनी दिली आहे. या प्रकरणी पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

आठवित शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार तिच्या पालकांनी मुख्याध्यापिका आणि शाळा व्यवस्थापनाकडे केली होती. मात्र पालकांच्या तक्रारीची दखल न घेता या मुख्याध्यापिकेने या मुलीलाच धमकावून याची कुठेही वाच्यता न करण्या बाबत दमदाटी केली. अगोदरच विनयभंगामुळे हादरलेल्या या मुलीने या बाबत आपल्या पालकांना सांगितले. त्यानंतर या बाबत गुरूवारी  उरण पोलीस ठाण्यात तक्रार केली. उरण पोलिसांनी मुख्याध्यापिका आणि विनयभंग करणाऱ्या आरोपी विरोधात भादवि कलम 354 ड, 506 आणि पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक केली. मात्र मुख्याध्यापिकेने न्यायालयातून अटक पूर्व जामिन मिळविला. कोणत्याही परिस्थितीत अशा समाजाला काळीमा फासणाऱ्या घटनेला समर्थन करणाऱ्या मुख्याध्यापिकेला जामिन मिळू नये अशी मागणी यावेळी पालकातर्फे करण्यात आली. यावेळी उरण तालुक्यातील महिला स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधी आणि पालक उपस्थित होते.