तरुणीचा विनयभंग करणार्‍या आरोपीला वर्षभरानंतर अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादर स्थानकात एका तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला वर्षभरानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीला पोलिसांनी शिर्डीतून अटक केली आहे.

9 ऑगस्ट 2018 रोजी एक तरुणी कामावरून घरी परतत होती. रात्री सुमारे पाऊणे अकराच्या सुमारास दादर स्थानकावर लोकल पकडण्यासाठी उभी होती. त्यावेळी स्थानकावर फार गर्दीही नव्हती. तेव्हा एक अज्ञात व्यक्ती तिथे आला आणि त्याने तरुणीला नको त्या जागी वाईट पद्धतीने स्पर्श केला. तेव्हा आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. तेव्हा तरुणीने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु निसटण्यास यशस्वी झाला.

पीडित तरुणीने तत्काळ रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने त्याचे छायाचित्र घेतले. तेव्हा एक वर्षाच्या कालावधीनंतर पोलिसांनी त्याला शिर्डीत अटक केली. आरोपीचे नाव प्रशांत ठाकूर असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. तो शिर्डी ते दादर दरम्यान चालणार्‍या बसचा सफाई कामगार आहे. पोलिसांनी त्याला शिर्डीतील त्याच्या राहत्या घरातून अटक केली असून त्याला रेल्वे पोलिसांत दाखल केले. त्याच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आले असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.