अश्लील चाळे करणाऱयाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकल प्रवासात विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करणाऱया मोहम्मद तौफिक राजेसाहेब बैलून या प्रवाशाला अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली.तक्रारदार विद्यार्थिनी बोरिवली येथून लोकलने प्रवास करत होती. गर्दी असल्याने ती पुरुषांच्या डब्यात चढली.

लोकल अंधेरी स्थानकात आली असता मोहम्मदने तिच्यासोबत अश्लील चाळे केली. तरुणीने आरडाओरड केल्यावर प्रवाशांनी मोहम्मदला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.