39 व्या वर्षी केले लग्न, बाळासाठी केले एग फ्रिजींग; वाचा काय म्हणतेय ही अभिनेत्री

जस्सी जैसी कोई नही या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मोना सिंह हिने गेल्या वर्षी वयाच्या 39 व्या वर्षी लग्न केले. लग्नाला वर्ष झालेले असतानाच आता तिने बाळाबद्दलचे तिचे प्लान्स जाहीर केले आहेत. मोनाने वयाच्या 34 व्या वर्षीच तिची स्त्री बीजं (अंड) फ्रिज करून ठेवली आहेत.

मोना सिंहने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बेबी प्लानिंगबाबत सांगितले आहे. ‘मी माझे स्त्री बीज फ्रिज करून ठेवली आहेत. त्यामुळे आता मी एकदम आझाद आहे. वयाच्या 34 व्या वर्षी मी हे केलेलं. आता मला माझ्या पार्टनरसोबत खूप वेळ घालवायचा आहे, जग फिरायचं आहे’, असे मोना सिंहने सांगिंतले.

विशेष लेख – मातृत्वाला वयाचे बंधन नाही

‘आतापर्यंत मी फक्त मित्र मैत्रिण कुटुंबासोबत फिरायचे. आता मला माझ्या नवऱ्यासोबत फिरायचं आहे. संपूर्ण जग फिरायचे प्लान्स आहेत माझे. मला लहान मुलं आवडतात पण अजुनही मी त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नाही, असे देखील मोनाने स्पष्ट केले आहे. मोनाने वयाच्या 34 व्या वर्षीच तिचे एग्ज फ्रिज केले होते. त्यासाठी तिने कामातून काही महिन्यांचा ब्रेकही घेतला होता.

मोना सिंह ही लवकरच आपल्याला आमीर खान व करिना कपूर यांच्यासोबत लाल सिंग चढ्ढा या चित्रपटात दिसणार आहे. मोनाने याआधी थ्री इडियट्स या चित्रपटात आमीर खान व करिना कपूर यांच्यासोबत काम केले आहे.

एग फ्रीझिंग म्हणजे काय?

– यात महिलेला दहा दिवस हार्मोन्सचे इंजेक्शन घ्यावे लागते.
– त्या इंजेक्शनमुळे महिलेच्या शरीरात ती अंडी तयार होतात.
– नंतर ऍनेस्थेशिया देऊन महिलेच्या शरीरातून ती अंडी बाहेर काढली जातात. या प्रोसेसला फक्त पंधरा मिनिटांचा वेळ लागतात व दोन तासांनी ती घरी निघून जाते.
–  ती अंडी गोठवली जातात
– त्यानंतर त्या महिलेवर अवलंबून असते तिला कधी बाळाचा विचार करायचा.

पुढची प्रक्रिया काय?

स्त्री जेव्हा मातृत्वासाठी तयार होते तेव्हा हे गोठवलेले बीज आणि पुरुषाचा शुक्राणू घेऊन परीक्षानळीत स्त्री बीज आणि शुक्राणूचा संयोग घडवून आणला जातो आणि त्यातून गर्भाची निर्मिती केली जाते. हा गर्भ या परीक्षानळीतच तीन दिवस वाढवला जातो आणि स्त्रीच्या गर्भाशयात गादी तयार केली जाते. त्यानंतर गर्भाचे रोपण केले जाते. गर्भ मातेच्या गर्भात वाढून प्रसूती होते.
.

आपली प्रतिक्रिया द्या