मनी हाईस्ट’ मधील ‘Bella Ciao च्या कडक मराठी व्हर्जन’ ची चर्चा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या वर्षीचा लॉकडाऊन कोणीच आयुष्यात विसरणार नाही. अनेकांनी खूप काही गमावलं, कमावलं, माणुसकी दिसून आली, चांगल्या कामात एकी सुद्धा दिसून आली. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे प्रेक्षकांचे घरबसल्या मनोरंजन करण्यासाठी बरेच सिनेमे, वेब सिरीज आल्या . त्या दरम्यान प्रदर्शित झालेल्या अनेक वेबसिरीज पैकी एक ‘मनी हाईस्ट’ ही वेब सिरीज विशेष गाजली. या वेब सिरीजमधील ‘Bella Ciao’ हे गाणं सुद्धा खूप लोकप्रिय झालं आणि खूप कमी वेळेत सर्वांच्या पसंतीस सुद्धा पडलं.

नवीन वर्षात सर्वकाही सुरळीतपणे सुरू होईल अशी आशा जनतेने ठेवली होती, पण सुरुवातीचे काही महिने गेल्यावर पुन्हा लॉकडाऊन लागला आणि History Repeats असं म्हणावं लागेल. गेल्या वर्षी जी कोरोनाची लाट आली ती गंभीर होतीच पण आता ही दुसरी लाट महाभयंकर आहे आणि हे आपण सर्वजण पाहतोय. असं असूनही काही ठिकाणी गर्दी आणि मास्क हनुवटीच्या खाली आहेच. लोकांना त्यांच्या पद्धती नेच समजावून सांगण्यासाठी ‘कडक एंटरटेमेंट’ घेऊन आले आहे ‘Bella Ciao चं कडक मराठी व्हर्जन’.

स्वप्निल संजय मुनोत आणि अक्षय मुनोत यांच्या ‘अहमदनगर फिल्म कंपनी’ची निर्मिती असलेलं ‘Bella Ciao चं कडक मराठी व्हर्जन ‘ ‘ कसा ला’ गाण्याची कल्पना नितिश कटारिया आणि स्वप्निल  मुनोत यांची आहे.

कडक एंटरटेमेंट, नरेंद्र फिरोदिया, मयुरी स्वप्निल मुनोत आणि श्रुती अक्षय मुनोत हे या गाण्याचे प्रस्तुतकर्ते आहेत. तसेच, गाण्याचं दिग्दर्शन संदीप दंडवते यांनी केले असून गाण्याचे बोल अतिश हरेल आणि Sanja ( संजा) यांनी लिहिले आहे. वोकल आणि संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी निरंजन पेडगांवकर यांनी सांभाळली आहे. कडक मराठीच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून घराघरांत पोहचलेले कलाकार महेश काळे, लहुकुमार चोभे, वैभव कुऱ्हाडे, तेजस अंधाळे, कन्हैया तिवारी, रोहित पोफाळे यांनी या गाण्यात अभिनय केला आहे.

एकंदरीत, या गाण्याच्या निमित्ताने ‘कडक एंटरटेमेंट’ च्या संपूर्ण टीमने एकत्र येऊन समाजाच्या हितासाठी एक महत्त्वाचा, सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.