अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज फैसला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनी लॉण्ड्रिग प्रकरणी नोव्हेंबर 2021 मध्ये ईडीद्वारे अटक करण्यात आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज  दाखल केला असून त्यांच्या अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झाला आहे. उद्या 4 ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती एन. जे. जमादार यावर निकाल सुनावणार आहेत. अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयात अनेक महिने प्रलंबित असल्याने सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला फटकारले होते. त्यानंतर गेल्या आठवडय़ात न्यायमूर्ती एन.जे. जमादार यांच्या समोर देशमुखांच्या जामीन अर्जावर दोन दिवस मॅरेथॉन सुनावणी घेण्यात आली होती.