
सामना ऑनलाईन । श्रीगोंदा
श्रीगोंदा तालुक्यातील आर्वी हे गाव भीमा नदीच्या पात्रातील बेटावर असल्याने सध्या भीमा नदीत होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे अगोदरच हे आर्वी बेटाला पाण्याचा वेढा असल्याने अजून जरी या बेटाचा संपर्क तुटला नसला तरी पुराचे पाणी वाढल्यास अनेक वेळा या बेटाचा संपर्क होत नसतो . सध्या मात्र या ठिकाणी रहिवासी असलेल्या चाळीस ते पन्नास कुटुंबियांना एका वानराने त्रास देण्यास सुरुवात केली असून येथे आलेले एक वानराने तीन जणांना कडकडून चावा घेतला असल्याने नागरिक दहशती खाली आहेत. याबाबत पोलीस पाटील यांनी वन विभागाला माहिती दिली आहे .
भीमा नदीच्या पात्रात असलेले आर्वी हे बेटावर चाळीस ते पन्नास कुटुंबीयांची वस्ती आहे तिथे शेती आहे याबेटाला भीमा नदीत येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे अनेक वेळा इथला संपर्क पावसाळ्यात तुटत असतो यावेळी प्रशासन तातडीने उपाययोजना आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवत असते या बेटावर तुरळक वस्ती असली तरी उर्वरित क्षेत्रावर शेत जमीन आहे . येथे शेती केली जाते या आर्वी बेटावर राहणाऱ्या नागरीकांना सध्या एका वानराने त्रास दिला आहे. हे वानर दौंड तालुक्यातील देऊळगाव च्या पुलाच्या बाजूला हुसकावून लावले तरी पुन्हा परत येत आहे . या वानराने दादा झुंबर गिरमकर वय २९ , दीपा म्हन्द्र गिरमकर वय २२ , बापू किसन चव्हाणवर ३२ या तिघाना या वानराने कडकडून चावा घेतला असल्याने या तिघांच्यावर दौंड येथे उपचार सुरु आहेत .
याबाबत पोलीस पाटील यानी श्रीगोंदा वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी दिघे यांना याबाबत माहिती दिली असून हे वानराला पकडण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे .





























































