
लॉकडाऊन हटविताना अनेक सेवांना परवानगी देण्यात आल्याने मोनोरेल रविवारपासून मुंबईकराच्या सेवेत दाखल झाली आहे. तर घाटकोपर ते वर्सेवा मेट्रो सेवा सर्व अटी व शर्ती पाळून सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे. मोनोरेलच्या मोजक्याचे फेऱया चालविण्यात आल्या असून स.11 ते सायं.4 या वेळेत पाच तास मात्र तिने आराम घेतला आहे.
उपनगरीय लोकल ट्रेनचा प्रवास सर्वसामान्यांना उपलब्ध नसल्याने मुंबईची दुसरी लाइफ लाइन बेस्टवर बराच ताण येत आहे. त्यामुळे ‘मिशन बिगीन अगेन’ सुरू करताना राज्य सरकारने मेट्रो आणि मोनोरेल सेवांना सुरू करण्यात परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे आज रविवारपासून चेंबूर ते सातरस्ता धावणारी मोनोरेल प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. सकाळी 7 ते 11 आणि सायं.4 ते रात्री 9 या वेळेत दर 20 ते 25 मिनिटांना एक फेरी अशाप्रकारे मोनोरेलच्या मोजक्या 25 ते 27 फेऱया चालविण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
मोनोच्या एका डब्यात 30 प्रवाशांना प्रवेश
मोनारेलच्या एका डब्यात केवळ 30 प्रवासी अशा चार डब्यांत मिळून 120 प्रवाशांनाच प्रवेश देण्यात आल्याची मोनोरेल प्रशासनाने दिली. मोनोरेल प्रशासनाने कमीत कमी संपर्प येण्यासाठी ‘क्यूआर’ कोड आधारित तिकीट प्रणालीचा वापर सुरू केला आहे. सर्वसामान्यांना मोनोरेल आणि मेट्रो मधून तापमान तपासून प्रवेश देण्यात येणार आहे. एक आसन सोडून बसविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मेट्रो उद्यापासून सकाळी 8.30 ते रात्री 8.30 या वेळात धावणार आहे. तसेच दिवसभरात केवळ 200 फेऱया चालविण्यात येणार असून एका फेरीत एकावेळी केवळ 300 प्रवाशांना प्रवेश असणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.




























































