खूशखबर! मान्सून केरळात दाखल

14

सामना ऑनलाईन । मुंबई

सगळे ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो अखेर आला आहे. केरळच्या काही भागात मान्सून दाखल झाला आहे. मान्सून केरळात दाखल झाल्याचा दावा स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने केला आहे. मात्र हवामान विभागाने येत्या २४ तासांत मान्सूनचे केरळात दाखल होईल, असा अंदाज सोमवारी सकाळी वर्तवला आहे. केरळच्या विविध भागात आज पावसाच्या सरी कोसळल्या. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टी भागातही विविध ठिकाणी विजेता गडगडाटासह पावसाने हजेरी लावली.

यंदा सरासरीच्या ९७ टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तर स्कायमेटनेही १०० टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. स्कायमेटने याआधीच मान्सून २८ मे रोजी केरळात दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता, तो खरा ठरला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या