
हे सरकार दिखाऊ नाटकीपणा करतंय. पुतनामावशीचं प्रेम शेतकऱ्यांप्रती दाखवत आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार भास्कर जाधव यांनी आज सरकारच्या धोरणांवर ताशेरे ओढले. यासंदर्भात अधिक बोलताना भास्कर जाधव म्हणाले, बैल नाही म्हणून आज महाराष्ट्राचा शेतकरी नांगर हाकतोय, त्यांच्या पत्नी नांगर हाकण्याचं काम त्याच्यासोबत करत आहे, हे दृश्य अतिशय विदारक आहे. डोक्यावर पदर घेऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान राखत असलेले हे जोडपे राज्याच्या सहकारमंत्र्याच्या मतदार संघातील आहे.
शिवसेना व मनसेच्या नेत्यांनी वरळीतील एनएससीआय डोमची केली एकत्रित केली पाहणी
शेतकऱ्यांच्या होत असलेल्या याच हालअपेष्टांवर आम्ही आता स्थगन प्रस्ताव मांडला आहे. शेतकऱ्यांच्या या मुद्द्यावर विधीमंडळात चर्चा व्हायलाच हवी म्हणून आम्ही आग्रह धरला. परंतु, यावर मात्र कोणताच प्रतिसाद सरकारकडून मिळाला नाही. म्हणूनच आम्ही सभागृहातून बाहेर पडलो तर, आम्ही बाहेर पडल्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायम चर्चेला तयार आहे, असे म्हटले.
नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या दबावाखाली फडणवीसांना मुंबई तोडायची आहे, संजय राऊत यांची टीका
नाईलाजास्तव आम्ही बाहेर पडल्यानंतर मात्र विरोधी पक्ष चर्चेला तयार नाही, असे वातावरण तयार केले. हे सरकार किती बेमुर्वतखोर आहे, या सरकारला शेतकऱ्यांविषयी कणव नाही. आम्ही या सरकारचा निषेध करतो. सरकार दिखाऊ नाटकीपणा करतंय, पुतनामावशीचं प्रेम दाखवतंय या सरकारवर विश्वास ठेवू नका अशी आम्ही विनंती करतोय, असे आवाहन भास्कर जाधव यांनी केले.