ना कंडोम ना गोळ्या, आता बँडेज रोखणार गर्भधारणा

49052
contraceptive-patch

गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोम किंवा महिला गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करतात. गर्भधारणा टाळण्यासाठी हा आतापर्यंतचा सर्वात सोपा उपाय मानला जात होता. मात्र असे असले तरी या गोळ्यांचे साईड इफेक्ट देखील होतात. तसेच या गोळ्या न विसरता वेळेवर घेणं हे देखील गरजेचं असतं. त्यामुळे ही एक प्रकारची जोखीम मानली जाते.

तुम्ही चुकूनही गोळ्या खाण्यास विसल्यास गर्भधारणा होते आणि पुढील परिणामांना सामोरं जावं लागतं. मात्र महिलांची आता यापासून सुटका होऊ शकते. संशोधकांनी गर्भनिरोधक गोळ्यांवर एक चांगला विकल्प शोधला आहे.

संशोधकांनी एक असे कॉन्ट्रासेप्टिव पॅच शोधून काढला आहे जो गोळ्यांप्रमाणेच काम करतो. हा पॅच त्वचेला चिकटतो आणि हळूहळू 30 दिवस महिलांच्या रक्तात कॉन्ट्रासेप्टिव ड्रग सोडत राहतो.

अगदी छोट्या आकाराच्या या उपकरणात बारीक – बारीक सुया आहेत. ज्यांचा त्वचेशी संपर्क आल्यास त्या कॉन्ट्रासेप्टिव ड्रग सोडण्यास सुरुवात करतात.

‘जॉर्जिया इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’च्या संशोधकांनी याचा प्रयोग सर्वात आधी उंदरांवर केला होता, तेव्हा हा पॅच अत्यंत सुरक्षित असल्याचे समोर आले होते. त्यानंतर याचे महिलांवर परिक्षण करण्यात आले असता सकारात्म परिणाम मिळाले.

ज्या 10 महिलांवर प्रयोग करण्यात आले त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास यावेळी जाणवला नाही. तसेच सकारात्मक परिणाम मिळाले.

केमिकल आणि बायोमॉलेक्युलर इंजीनिअरिंगच्या प्रोफेसर मार्क प्रुस्निट्ज यांच्यासह अन्य अन्य संशोधकांचेही म्हणणे आहे की, कॉन्ट्रासेप्टिव पॅच त्या महिलांकरता गेम-चेंजर ठरू शकतो ज्या रोज औषधं-गोळ्या घेऊन थकल्या आहेत.

अनेकदा महिला गोळ्या घेण्यास विसरतात आणि त्यामुळे गंभीर परिणाम होतात. त्यामुळे बऱ्याच काळासाठी चालणारे गर्भनिरोधक पॅच वापरण्यास स्त्रीरोगतज्ज्ञांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे कळते.

ज्या देशांमध्ये गर्भनिरोधक गोळ्या अद्याप पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत अशा देशांमध्ये याचा उपयोग करता येणे शक्य आहे.

आपली प्रतिक्रिया द्या