
देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेवटच्या स्थानी आहेत. ‘मूड ऑफ द नेशन’ ही संकल्पना घेऊन इंडिया टुडे व सी. व्होटरने संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणातून हे समोर आले आहे. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे.
देशात सर्वात चांगली कामगिरी करणारे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांना केवळ 1.7 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. ते दहाव्या स्थानी आहेत, तर योगी आदित्यनाथ यांना सर्वाधिक 36 टक्के लोकांनी मते दिली आहेत. ममता बॅनर्जी यांना 12.5 टक्के, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना 7.3 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. चौथ्या स्थानी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत. पाचके स्थान तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पटकाकले आहे.