‘शौचालय’ फेम खासदार हेमंत पाटील मुर्दाबाद! किनवट येथे मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चमकोगिरी करण्यासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांना शौचालय साफ करायला लावणारे लावणीबाज शौचालय फेम खासदार हेमंत पाटील यांच्या निषेधार्थ शुक्रवारी आदिवासी, बंजारा तसेच अनुसूचित जाती समाज समन्वय समितीच्या वतीने नांदेड तसेच किनवट येथे मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकर्‍यांनी खासदार पाटलांच्या अटकेची मागणी केली. नांदेड येथील मोर्चाचे नेतृत्व दत्तात्रय वाळके, अ‍ॅड. दिलीप राठोड, संतोष तायवाडे, नागोराव मेंडके आदींनी केले तर किनवटचा मोर्चा प्रा. खुपसे, प्रा. मिरासे. दादाराव टारपे, गोपीनाथ बुलबुले, डॉ. सुभाष वानोळे, डॉ. आशिष डुडुळे, कॉ. शंकर सिडाम, वसंत कुडमते, प्रा. विकास हातमोडे, जे. टी. पाटील आदींच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.