
अहमदाबाद-मुंबई दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या बुलेट ट्रेनच्या मार्गावर रविवारी रात्री गर्डर कोसळून झालेल्या अपघाताचा पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. अपघातानंतर जवळपास 25हून अधिक एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या. तसेच 5 गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आणि 6 गाड्यांचे मार्ग बदलले.
मुंबई सेंट्रल-गांधीनगर राजधानी, वंदे भारत एक्सप्रेस, इंदूर-गांधीधाम एक्सप्रेस, इंदूर-अहमदाबाद शांती एक्सप्रेस, ग्वाल्हेर-अहमदाबाद स्पेशल, वटवा-बोरिवली एक्सप्रेस, अहमदाबाद-मुंबई सेंट्रल एक्सप्रेस, वडोदरा-वटवा इंटरसिटी, अहमदाबाद-वलसाड गुजरात क्वीन, जामनगर-वडोदरा इंटरसिटी, वडनगर-वलसाड-वडनगर एक्सप्रेस, वाटवा-आनंद एक्सप्रेस आदी 25 गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.































































