राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची रेकॉर्ड ब्रेक नोंद, एका दिवसात 32 हजार रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात आज सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण संख्येची विक्रमी नोंद झाली असून 32 हजार 7 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण 9 लाख 16 हजार 348 रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.84 टक्के इतके नोंदविले गेले असून आज बरे झालेल्या रुग्णांपेक्षा निम्म्या संख्येने नवीन रुग्णांचे निदान झाले. आज राज्यात 15 हजार 738 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या देखील कमी होऊन 2 लाख 74 हजार 623 ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 59 लाख 12 हजार 258 नमुन्यांपैकी 12 लाख 24 हजार 380 नमुने पॉझिटिव्ह  (20.71 टक्के) आले आहेत. राज्यात  18 लाख  58 हजार 924 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 35 हजार 517 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 344 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.7 टक्के एवढा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या