तीन वर्षात साप चावून तीन हजारहून अधिक लोकांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2016 ते 2018 या तीन वर्षाच्या काळात साप चावून तब्बल तीन हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने ही माहिती दिली असून मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण पश्चिम बंगालमध्ये आहे.

2016 साली 1 हजार 68, 2017 साली 1 हजार 60 तर 2018 मध्ये 885 लोकांचा मृत्यू साप चावल्याने झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये या तीन वर्शाच्या काळात 609 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या एकूण संख्येत हे प्रमाण तब्बल 20 टक्के इतके आहे.

सरकारने जो मृतांचा आकडा दिला आहे त्यापेक्षा जास्त असल्याचे जोस लुईस यांनी सांगितले आहे. जोस लुईस हे वाईल्ड ट्रस्टसोबत काम करत असून त्यांनी स्पेरेंट हे मोबाईल ऍप बनवले आहे. या ऍपच्या माध्यमातून साप चावलेल्या रुग्णाला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करता येते. तसेच प्रथमोपचाराची माहितीही या ऍपमध्ये देण्यात आली अहए.

काही राज्यात दर महिन्याला पाचशे लोकांचा मृत्यू होतो असा अंदाज लुईस यांनी व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालमध्ये विषरोधकाचा योग्ग्य पुरवठा नसल्याने राज्यात मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे. तसेच डॉक्टरांनाही या बाबतीत योग्य तसे प्रशिक्षण न दिल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. 90 टक्के रुग्णांना कोब्रा, फुरसं आणि घोणस चावल्याचे निदर्शनास आले आहे. देशात फक्त पाच विषरोधक केंद्र असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.