मजुरांना घरी नेण्यासाठी सर्वाधिक ट्रेन उत्तर प्रदेश बिहारमध्ये, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक कमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांसाठी श्रमिक ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. देशात सर्वाधिक श्रमिक ट्रेन उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये चालवण्यात येत आहेत. तर सर्वाधिक कमी ट्रेन या तमिळनाडून आणि पश्चिम बंगालसाठी चालवण्यात येत आहेत.

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात 468 श्रमिक ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 363 ट्रेन आपल्या गंतव्य ठिकाणी पोहोचल्या असून 105 ट्रेन लवकरच आपल्या गंतव्य ठिकाणी पोहोचतील. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ट्रेन सोडण्यात आल्या आहेत त्यांचे प्रमाण 73 टक्के इतके आहे. त्यानंतर मध्य प्रदेश, ओडिशा आणि झारखंडसाठी ट्रेन सोडण्यात आल्या आहेत.

आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेशसाठी प्रत्येकी एक ट्रेन सोडण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात तीन, राजस्थानसाठी चार ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. तेलगांणा आणि पश्चिम बंगालसाठी दोन ट्रेन सोडण्यात आल्या आहेत.