
तमिळनाडूतील तीन हजारहून अधिक दलित समाजातील लोक मुस्लीम धर्म स्विकारणार आहेत. सरकारने आपल्यासोबत भेदभाव केल्याचा अरोप दलित समाजातील नागरिकांनी केला आहे. रविवारी दलितांची संघटना तमिल पुलीगलची रविवारी एक बैठक पार पडली. त्यात दलित नागरिकांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
द हिंदूने याबाबत वृत्त दिले आहे. तमिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील दलित समाजाने मुस्लीम धर्म स्विकारण्याचे जाहीर केले आहे. राज्य सरकारने आपल्यावर अन्याय केला तसेच सरकारने आपल्याशी भेदभाव केल्याची भावना दलित बांधवांमध्ये आहे. 2 डिसेंबर रोजी दलित समाजाच्या रहिवासी भागात एक भिंत कोसळली. या दुर्घटनेट दलित समाजाच्या 17 लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 10 महिला तर 2 बालकांचा समावेश होता. या प्रकरणी आरोपीला अटक झाली परंतु अवघ्या 20 दिवसांत याला जामीन मंजूर झाल्याने दलित बांधवांमध्ये रोष पसरला.
आरोपीने दलितांशी अंतर ठेवण्यासाठी ही भिंत बांधली होती असे दलित समाजातील लोकांनी सांगितले. आरोपीने या भिंतीची उंची 20 फुटांनी वाढवली. दलित बांधवांनी त्याला विरोध केला तरी आरोपीने त्यांचे ऐकले नाही. परिणामी भिंत कोसळली आणि त्यात 17 जणांचा मृत्यू झाला. आरोपीवर ऍट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई न झाल्यानेही दलितांनी नाराजी दर्शवली.
जेव्हा ही दुर्घटना झाली तेव्हा दलित बांधवांनी ज्यांनी मुस्लिम धर्म स्विकारला त्यांनी आम्हाला मदत केली असे दलित समुदायाच्या नागरिकांनी सांगितले. जर आम्ही मुस्लिम धर्म स्विकारला तर आमचे आरक्ष गेले तरी चालेल असा पवित्रा दलित बांधवांनी घेतला आहे. कारण कायदे असून त्याची अंमलबजावणी होत नाहिये. तसेच खासगीकरणामुळे शासनामध्ये एवढ्या नोकर्या राहिल्या नसल्याचेही त्यांनी सांगितले.





























































