महाराष्ट्रापेक्षा गुजरातमधून 303 अधिक श्रमिक ट्रेन सोडल्या

2059

परप्रांतिय मजुरांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात असताना रेल्वे मंत्रालयाने मात्र गुजरातमधून जास्त श्रमिक ट्रेन सोडल्या आहेत. महाराष्ट्रापेक्षा 303 अधिक ट्रेन गुजरातमधून सोडल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या कारभाराचा पर्दाफाश त्यांनी दिलेल्या आकडेवारीरूनच झाला आहे.

महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 12 कोटी आहे. गुजरातची 6.2 कोटी आहे. परप्रांतिय मजुरांची संख्याही महाराष्ट्रामध्ये गुजरातपेक्षा जास्त आहे. मात्र, रेल्वेने गुजरातला झुकते माप दिले आहे. 1 मे पासून 25मे पर्यंत देशात एकूण 3060 श्रमिक स्पेशल ट्रेन सोडल्या आहेत. यात गुजरातमधून सर्वाधिक 853 ट्रेन सोडल्या. महाराष्ट्रातून 550 ट्रेन सोडल्या आहेत. पंजाबमधून 333, उत्तरप्रदेशातून 221 तर दिल्लीतून 181 श्रमिक ट्रेन सोडल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या