झेल सोडा अन् रडा! पाकिस्तान इथं नंबर वन

91
cricket-world-cup-2019-pakistan-have-dropped-the-most-catches-of-the-tournament

सामना ऑनलाईन । लंडन

क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. त्यामुळे जो संघ केवळ फलंदाजी किंवा गोलंदाजीवर अवलंबून असतो, त्या संघाचा मोक्याच्या वेळी घात होतो, असे अनेक सामने आपण पाहिले आहेत. ऑस्ट्रेलियाने तर क्षेत्ररक्षणाच्या जोरावर अनेक सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे फलंदाजी, गोलंदाजीबरोबर तुमचे क्षेत्ररक्षणही तितकेच अभेद्य असायला हवे. नाहीतर झेल सोडा अन् हरल्यानंतर रडा अशी अवस्था होते. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या लढतींमध्ये झेल सोडण्याच्या बाबतीत पाकिस्तान ‘नंबर वन’ स्थानावर असून ‘टीम इंडिया’ शेवटच्या स्थानावर आहे, हे विशेष.

याआधी, ‘टीम इंडिया’ची मदार फलंदाजीवरच असायची असा इतिहास आहे. मात्र अलीकडच्या काळात हिंदुस्थानी क्रिकेटपटू फलंदाजीबरोबरच गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावरही सामने जिंकून द्यायला लागलेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत फलंदाजांनी हाराकिरी केल्यानंतर हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी ‘टीम इंडिया’ला जिंकून दिले. फिटनेसच्या बाबतीत बरेच मागे असलेल्या पाकिस्तानने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत उडालेल्या 26 झेलपैकी सर्वाधिक 14 झेल सोडले.

पाकिस्तानची खराब फिल्डिंग

देश- झेल उडाले – सोडले
पाकिस्तान-  26 – 14
इंग्लंड – 42 – 10
द. आफ्रिका – 31 – 07
न्यूझीलंड – 33 – 06
ऑस्ट्रेलिया – 35 – 06
हिंदुस्थान – 15 – 01

आपली प्रतिक्रिया द्या