देशातला सर्वात मोठा हिऱ्याचा गणपती बाप्पा पाहिलात का?

महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे. सर्व देवतांमध्ये अग्रपूजेचा मान लाभलेल्या गणपती बाप्पाची विविध रुप घरोघरी विराजमान झाली आहे. गुजरातची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या सूरत या शहरात देशातील सगळ्यात मोठ्या आणि महाग अशा हिऱ्याच्या रुपातील गणरायाची प्रतिष्ठापना एका व्यापाऱ्याने केली आहे.

diamond-ganesh

राजेश पांडव असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. हिरे व्यापारी असलेले पांडव दर वर्षी या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. हा हिरा 27.74 कॅरेटचा असून त्याची आजघडीची किंमत 500 कोटी रुपये इतकी आहे. आपल्यासाठी मात्र हा हिरा अनमोल असल्याचं राजेश यांचं म्हणणं आहे. हा हिरा 2005मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या खाणीतून बाजारात विक्रीसाठी आला होता. गणरायाच्या आकृतीतला हा हिरा राजेश यांनी खरेदी केला आणि तेव्हापासून दर गणेशोत्सवात या हिऱ्याची ते पूजा करतात.

आपली प्रतिक्रिया द्या