जगाला विनाशाच्या खाईत लोटणाऱ्या ‘या’ शस्त्रांचा शोध लावून शास्त्रज्ञही पस्तावले

1517

शस्त्र म्हटले की युद्ध आलं आणि युद्ध म्हटलं की संहार आलाच… हे आपण दोन विश्वयुद्धामध्ये पाहिले आहेच… पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत दुसऱ्या महायुद्धामध्ये अनेक संहारक शस्त्रांचा वापर केला गेला आणि यात लाखो लोकांचा जीव गेला… आजही जगावर तिसऱ्या महायुद्धाचा धोका कायम आहे… पूर्वीच्या तुलनेत आता अनेक आत्याधुनिक आणि संहारक शस्त्रांची निर्मिती शास्त्रज्ञांनी केली आहे आणि यात सातत्याने सुधारणा होत आहे… मात्र ही संहारक शस्त्र बनवल्यानंतर शास्त्रज्ञांनीही खंत आणि खेद व्यक्त केला आहे. घेऊया अशाच काही शस्त्रांची आणि शास्त्रज्ञांची माहिती…

alfraid-nobelडायनामाइट –
डायनामाइटचा शोध स्वीडिश शास्त्रज्ञ ‘अल्फ्रेड नोबेल’ यांनी लावला होता. अल्फ्रेड नोबेल या वैज्ञानिकांच्या नावाने नोबेल पारितोषिके दिली जातात. या डायनामाइटचा उपयोग युद्धात झाल्याने नोबेल हे अत्यंत निराश झाले होते, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. त्यांचा हा शोध युद्धाला कारणीभूत ठरेल हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यानंतर आपल्या शोधामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी त्यांनी नोबेल शांतता पुरस्कार सुरू केला.

atom-bombअणुबॉम्ब  –
अणुबॉम्बची निर्मिती अमेरिकेच्या मैनहटमन प्रकल्पातून केली आहे. या प्रकल्पाचे नेतृत्व रॉबर्ट ओपनहेमर यांनी केले होते. रॉबर्ट ओपनहेमर यांना अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जाते. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानचा बदला घेण्यासाठी अमेरिकेने ‘हिरोशिमा’ व ‘नागासाकी’ या दोन शहरात अणुबॉम्ब टाकले होते. पहिल्यांदा ओपनहेमर त्यांच्या यशाने खुप खूष होते. पण नंतर त्यांना अणुबॉम्ब बनविल्याचा पश्चाताप झाला. या शस्त्रावर बंदी घालण्याची विनंती त्यांनी सरकारला केली. या शोधाला प्रोत्साहन देणारे शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांनाही त्यांच्या या निर्णयाबद्दल खेद वाटला. त्यांनी ही सर्वात मोठी चूक वाटत असल्याचे म्हटले होते.
ak-47एके 47 –
मिखाइल कलाश्निकोव यांनी एके-47 या रायफलचा शोध 1947 मध्ये लावला. 1949 मध्ये हे शस्त्र वापरण्यास सुरूवात झाली. रशियन सैन्यासाठी या शस्त्र विकसीत करण्यात आले. परंतु नंतर त्याचा वापर इतर देशांनीही करायला सुरुवात झाली. परंतु 2013 मध्ये मृत्यू होण्याच्या एक वर्षापूर्वी त्यांनी रशियाच्या ऑर्थोडॉक्स चर्चला एक पत्र लिहिले होते. या पत्राद्वारे त्यांनी हे हत्यार बनवल्यानंतर त्यांना झालेले दु:ख व्यक्त केले. या शस्त्रामुळे झालेल्या हत्येसाठी ते स्वत:ला जबाबदार धरत होते आणि ते त्याच्यासाठी असह्य आहे असेही त्यांनी त्या पत्रात नमूद केले होते.

airoplainविमान
जलद प्रवासासाठी विमानाचा उपयोग होतो. राईट बंधूंपैकी एक ऑर्व्हिल राईट यांनी विमानाचा शोध लावला. दुसऱ्या महायुद्धात बॉम्बस्फोट करण्यासाठी विमानांचा वापर झाला होता. या शोधामुळे हजारो लोक मरण पावले. आपल्या शोधामुळे लोकांचा मृत्यू झाला याबाबत त्यांनी व्यक्त केला होता.

paper-spreyपेपर स्प्रे –
1980 च्या दशकात अमेरिकेतील केंद्रिय तपास यंत्रणेच्या वापरासाठी वैज्ञानिकांनी पेपर स्प्रेचा शोध लावला. कामरान लॉमन हे याच्या निर्मात्यांपैकी एक होते. जगभरात ठिकठिकाणी होणारी आंदोलने दडपण्यासाठी पेपर स्प्रेचा वापर करण्यात येतो. ज्या हेतूसाठी पेपर स्प्रेचा शोध लावण्यात आला तो हेतू सोडून भलतीकडे याचा वापर वाढल्याने कामरान लॉमन यांनी खेद व्यक्त केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या