
दक्षिण कोरियन कंपनीने नुकताच 7000mAh ची दमदार बॅटरी असणारा स्मार्टफोन Samsung Galaxy M51 लॉन्च केला. हिंदुस्थानच्या बाजारात सर्वाधिक मजबूत बॅटरी असणारा हा स्मार्टफोन आहे. मात्र जागतिक बाजारात याहून ‘पॉवरफुल’ बॅटरी असणारे स्मार्टफोन आहेत.
1. Energizer Power Max P18K Pop

जगातील सर्वाधिक पॉवरफुल बॅटरी असणारा हा फोन आहे. या फोनमध्ये 18000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. एखाद्या विटेसारखा दिसणाऱ्या फोनचे वजनही जास्त आहे. या फोनला फुल स्क्रिन डिस्प्ले आणि ड्यूल पॉप-अप सेल्फी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
2. Energizer Power Max P16K Pr

Energizer कंपनीचा हा आणखी एक दमदार बॅटरीचा फोन आहे. यात 16000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये ड्युल कॅमेरा आणि रियर पॅनलवर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे.
3. Blackview BV9100

13000mAh दमदार बॅटरीसह येणाऱ्या या फोनमध्ये ड्युल प्रायमरी कॅमेरा आणि 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मीडियोटेक प्रोसेसरसह येणाऱ्या फोनला चार्जिंग आणि कनेक्टिविटीसाठी टाइप-सी पोर्ट देण्यात आला असून यामुळे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.
4. Doogee BL12000

पॉवरफुल बॅटरीसह स्टायलिश डिझाइनमध्ये हा फोन उपलब्ध आहे. फोनला 12000mAh ची बॅटरी देण्यात आली असून यूजरला जबरदस्त बॅटरी बॅकअप मिळतो. सोबत ड्युल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
5. Oukitel K10000 Pro

10,000mAh ची दमदार बॅटरी आणि 16 प्लस 2 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला MediaTek Helio P60 प्रोसेसर देण्यात आला असून 6 जीबी राम सोबत 6.3 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे.




























































