मुलीच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर आईची आत्महत्या

724
file photo

दागिन्यावरून झालेल्या किरकोळ वादातून मुलीने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला तर आईने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज अंधेरी परिसरात घडली. मुलीवर अंधेरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृत महिला या अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात कुटुंबीयांसोबत राहत होत्या. त्यांना एक मुलगी आहे. तिला सोमवारी बाहेर जायचे होते. त्यामुळे तिने आईकडे दागिने मागितले. दागिने कपाटात नसल्याने त्या मायलेकीमध्ये वाद झाला. त्यानंतर मुलीने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. ही माहिती तिच्या आईला समजली. दुपारी मुलीची आई टेरेसवर गेली. तिने तेथून उडी मारून आत्महत्या केली. महिला या दुसर्‍या मजल्यावर पडल्याचे त्यांच्या नोकराला समजले. नोकराने याची माहिती ओशिवरा पोलिसांना दिली. काही वेळात वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी आले. जखमी अवस्थेतील महिलेला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घडल्याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या