सतत रडतो म्हणून आईने मुलाला नाल्यात बुडवून मारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भिंवडी

अवघे सहा महिने वय असलेल्या लेकाच्या सततच्या रडक्या स्वभावाने हैराण झालेल्या आईनेच मुलाची निर्घृण हत्या केल्याचा क्रूर प्रकार भिवंडीत घडला. या प्रकरणी निर्दयी मातेला पोलिसांनी अटक केली असून नाल्याच्या पाण्यात बुडकून तिने पोटच्या मुलाला ठार मारल्याने शहरात एकच खळबळ उडाली. भिवंडीच्या धपाशी फाटा येथे पतीसोबत राहणाऱ्या आरोपी कल्पना गायकर (25 ) हिचा मुलगा रिषभ दोन दिवसांपासून रडत होता. त्यामुळे चिडलेल्या कल्पना ही मुलाला घेऊन माहेरी आली. यावेळी येथील नाल्याच्या पाण्यात बुडकून तिने रिषभला ठार मारले. त्यानंतर तिने बनाव रचत मुलगा मृत झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश सागडे यांनी तिची कसून चौकशी केली असता निर्दयी मातेचे क्रौर्य समोर आले.