मुलगा म्हणून स्वीकार करण्यास नकार,भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे आईला आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai bombay-highcourt

पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाचा कायदेशीर स्वीकार करण्यास नकार देणाऱया आई विरोधात मुलाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज पार पडलेल्या सुनावणीत न्यायमूर्तींनी आईला सहा आठवडय़ांत प्रतिज्ञापत्रावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.जोगेश्वरी येथे राहणारे मेकअप आर्टिस्ट श्रीकांत सबनीस यांचे वडील दीपक सबनीस हे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत काम करत असतानाच त्यांचा उषा पंडीत यांच्याशी 8 एप्रिल 1978 साली प्रेमविवाह झाला. काही महिन्यांनी श्रीकांत यांचा 28 फेब्रुवारी 1979 रोजी जन्म झाला.श्रीकांत हे अडीच वर्षांचे असताना 27 सप्टेंबर1981 रोजी त्यांची आई उषा यांनी डेक्कन एक्स्प्रेसमध्ये त्यांना सोडून दिले व उदय म्हसकर यांच्याशी पळून जाऊन दुसरा विवाह केला. दरम्यानच्याकाळात श्रीकांत यांचे संगोपन त्यांच्या आजी व मावशीने केले. फेसबुकवरून घेतला आईचा शोध डोंबिवली येथे उदय म्हसकर यांच्या सोबत राहणारी आपली आई उषा हिला श्रीकांत यांनी अखेर 30 वर्षांनंतर फेसबुकवर शोधून काढले. त्यानंतर श्रीकांत यांनी आपल्या कुटुंबासह आईची भेट घेतली त्यावेळी त्यांनी श्रीकांत हा आपला मुलगा असल्याचे मान्य केले. काही काळानंतर उषा यांनी श्रीकांत यांच्याशी संपर्क ठेवणे कमी केले व मुलगा म्हणून स्वीकार करण्यासही नकार दिला.आपल्या आईच्या या कृत्यामुळे मनस्ताप झालेल्या श्रीकांत यांनी ऍड.श्याम दिवाणी यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.