
सामना प्रतिनिधी । लातूर
मोबाईलवर बोलत रस्त्याने जाणाऱ्या युवकाचा मोबाईल पळवण्यात आल्याची घटना घडली. प्रमोद महादेव मोरे (वय २८) हा रात्री ८.४५ वाजता शहरातील खाडगाव रोडवरुन घराकडे चालत जात होता. मोबाईलवर बोलत जात असताना पल्सर मोटारसायकल वरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पलायन केले. त्यांनी आपल्या तोंडाला फडके बांधलेले होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात मागील कांही महिन्यांपासून असे प्रकार वाढत आहेत. पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरीकांचे, शिकवणीस जाणाऱ्या विद्यार्थींचेही मोबाईल पळवण्यात आले आहेत. भाजी मार्केट मध्येही मोबाईल चोरीचे प्रकार घडले आहेत.





























































