चोख बंदोबस्तात माऊंट मेरी जत्रा सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वांद्रे येथील प्रसिद्ध माऊंट मेरी जत्रेला रविवारपासून सुरुवात झाली आहे. आठवडाभर चालणाऱया या जत्रेत देशभरातील विविध समाजातील लोक सहभागी होतात. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता येथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.माऊंट मेरी यात्रेला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता बेस्टतर्फे 15 सप्टेंबरपर्यंत वांद्रे पश्चिम ते माऊंट मेरी चर्च यादरम्यान जादा बसेस चालवण्यात येणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनीदेखील कंबर कसली असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला आहे. तब्बल 200 पोलीस कॉन्स्टेबलसह राज्य राखीव पोलीस दल, मोबाईल युनिट, श्वानपथक तसेच बॉम्बशोधक आणि नाशक पथक येथे तैनात ठेवल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ यांनी दिली.