BSNL चे कर्मचारी गद्दार, खासगीकरणानंतर काढून टाकणार; खासदार अनंतकुमार हेगडे पुन्हा बरळले

1674

आपल्या वादग्रस्त वक्त्यव्यांमुळे चर्चेत राहणारे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बीएसएनएलचे कर्मचारी गद्दार आहेत असे हेगडे म्हणाले आहेत. कर्नाटकात एका कार्यक्रमात ते बोलत होते.

हेगडे म्हणाले की बीएसएनएलचे कर्मचारी गद्दार आहेत. त्यांना एक चांगली संस्था चालवता येत नाही. बीएसएनएलचे खासगीकरण झाल्यानंतर 88 हजार कर्मचार्‍यांना काढून टाकण्यात येईल असेही हेगडे म्हणाले.

दलित म्हणजे कुत्रे! केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे बरळले   

हेगडे यांनी पहिल्यांदाच वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही. आम्ही देशाची राज्यघटना बदलण्यासाठीच सत्तेवर आलो आहोत असे हेगडे म्हणाले होते. तसेच दलित म्हणजे कुत्रे आहेत असेही हेगडे म्हणाले होते. तर महात्मा गांधी यांचा स्वातंत्र्यासाठी लढ म्हणजे नाटक होते असेही हेगडे म्हणाले होते.

‘सेक्युलर’ लोकांना बापजाद्यांच्या रक्ताची ओळख नसते – केंद्रीय मंत्री हेगडे

आपली प्रतिक्रिया द्या