खासदर अशोक नेते यांच्या गाडीचा अपघात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गडचिरोली – चिमूरचे खासदार अशोक नेते यांच्या गाडीला शनिवारी मोठा अपघात झाला. भरधाव टिप्परने खासदार नेते यांच्या गाडीला धडक दिली. पण सीटबेल्टच्या वापरामुळे एअरबॅग वेळीच उघडले आणि त्यामुळे खासदार अशोक नेते, चालक व सुरक्षारक्षक हे सगळे बचावले आणि सुदैवाने कोणतीही जीवीत्तहानी झाली नाही. नागपुरच्या उमरेड महामार्गाजवळ हा अपघात घडला.