चीनवर बोलायचं सोडून चण्यांवर बोलत बसले, खासदार ओवैसी यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान मोदी यांनी आज देशाला उद्देशून भाषण केले. भाषणात त्यांनी लॉकडाऊन आणि कोरोना संकटावर भाष्य केले. तसेच गरिबांना दिवाळीपर्यंत गहू तांदूळ आणि चणे मोफत दिले जाईल असे जाहीर केले. परंतु पंतप्रधान मोदी चीनवर बोलण्या ऐवजी चण्यावर बोलत बसले अशी टीका खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. तसेच भाषणात मोदींनी ईदचा उल्लेख केलाच नाही असेही ओवैसी म्हणाले.

ओवैसी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “आज चीन वर बोलायचे होते तर चण्यांवर बोलत ब्सले. त्याची पण गरज नाही कारण आपण घोषित केलेल्या अनियोजित लॉकडाऊनमुळे अनेक लोक उपाशी राहिले आहेत.” तसेच पुढील काळात येणारे अनेक सणांची तुम्ही नावं घेतली पण तुम्ही बकरी ईद विसरले. तरी तुम्हाला इदच्या शुभेच्छा असे ओवैसी म्हणाले.