रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा नको, खासदार श्रीनिवास पाटील यांनी घेतला राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रस्ता हा विकासाचा आरसा असतो, त्यामुळे रस्त्यांची कामे ही गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हायला हवीत. रस्त्यांच्या कामात कुठलाही हालगर्जीपणा करू नये अशी सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्य़ांना दिली आहे. कराड-चिपळूण व आदर्की-लोणंद या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्य़ांसोबत सातारा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

श्रीनिवास पाटील यांनी कराड ते चिपळूण व आदर्की ते लोणंद या मार्गाचा आढावा संबंधित अधिकाऱ्य़ांकडून घेतला. यावेळी ते म्हणाले, कराड ते चिपळूण मार्गाच्या रूंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र या कामाच्या गुणवत्तेबाबत स्थानिक नागरिकांमधून तक्रारी होत आहेत. त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली पाहिजे. त्यासंदर्भातील असणाऱ्य़ा त्रुटी दूर करून मार्गातील आवश्यक सुधारणा कराव्यात. ज्या-ज्या ठिकाणी सिमेंट कॉंक्रिटच्या रस्त्याला तडे गेले आहेत त्याठिकाणी अपघात होण्याच्या शक्यता अधिक आहेत. त्यामुळे  तेथे तातडीने दुरूस्ती करावी. याशिवाय रस्त्याच्या दरम्यान अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यात यावीत. लोणंद ते आदर्की मार्गाच्या सुस्थितीबाबत अधिकाऱ्य़ांनी लक्ष द्यावे. रस्त्यांची गुणवत्ता आणि दर्जाबाबत कोणत्याही तडजोडी करू नयेत असेही पाटील म्हणाले.