
हरिद्वारमध्ये कुंभमेळ्यातून परतलेल्या अनेक भाविकांना कोरोनाची लागण झाली आहे. मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यातील 60 भाविकांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
विदिशा जिल्ह्यातील 83 भाविक 11 ते 15 एप्रिल दरम्यान हरिद्वारला कुंभमेळ्यासाठी गेले होते. सर्व भाविक 25 एप्रिल रोजी घरी परतले. कुंभमेळ्यातून परतल्यानंतर 61 भाविकांची कोरोना चाचणी करण्यात आली.
त्यापैकी 60 भाविकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. इतर 22 भाविक कुठे आहे याची माहिती मिळालेली नाही. आरोग्य अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. इतर 55 रुग्णांना घरातच विलगीकरण करण्यात आले आहे. कुंभहून आलेल्या सर्व भाविकांवर लक्ष ठेवण्यात आले आहे अस एका अधिकार्याने म्हटले आहे.
जे जे भाविक कुंभमेळ्यातून परतले आहेत, त्यांची जर कोरोना चाचणी न करता विलगीकरण कक्षात नाही ठेवले तर त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भिती अधिकार्यांनी व्यक्त केली आहे.





























































