
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 1 नोव्हेंबर 2020 व 22 नोव्हेंबर 2020 रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत. या परीक्षांच्या सुधारित तारखा नंतर जाहीर करण्या येतील, असे लोकसेवा आयोगाच्या प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.




























































